ग्रामीण भागातील विद्यार्थिनी     कुमारी मृदुला मारुती खरात  महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी...,...



..................

 पारे गावासारख्या ग्रामीण भागातून आलेली सध्या घेरडी येथे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घेरडी ता सांगोला जि सोलापूर येथे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेली अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धिमत्तेची,प्रतिभावान, सु स्वभावी, सर्व गुण संपन्न,उत्कृष्ट भाषणशैली,

 अप्रतिम चित्रकारिता यासारख्या गुणांना वाव देऊन स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये धरून सतत मेहनत, चिकाटी,अभ्यासू वृत्ती, प्रयत्नशील,जिज्ञासू असलेले कुमारी मृदुला मारुती खरात हिने इयत्ता सातवी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मेडशिंगी परीक्षा केंद्रात इयत्ता सातवी मध्ये प्रथम व राज्य गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक झाली असून महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती तिला पुढील तीन वर्षे मिळणार आहे. 

यानिमित्ताने तिचा मॉडर्न हायस्कूल घेरडी तालुका सांगोला येथे सन्माननीय माजी आमदार श्री दीपक आबा साळुंखे पाटील, फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री.भाऊसाहेब रुपनर  सांगोल ता.पंचायत समितीच्या सभापती इंगवले मॅडम,

 सांगोल तालुक्याचे युवा नेते व सांगोल तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष, श्री अनिकेत भैया देशमुख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा सन 2025- 26 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घेरडी केंद्रात इयत्ता सातवी मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविला 

व सांगोला येथील सत्कार समारंभास पात्र झाली. तसेच एस्पिरेशन टॅलेंट सर्च (ATSE)हि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असून या परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर केंद्रातून जिल्ह्यात सातवी आली आहे 

त्यानिमित्ताने तिचा सत्कार सांगोला येथे पार पडला. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शक हितचिंतक यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर गावातील सर्व गावकरी प्रतिष्ठित मंडळी सर्व संस्थांची पदाधिकारी पालक यांनी तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक करून तिला पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post