*शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू : गटशिक्षणाधिकारी युवराज निलख
*
प्रतिनिधी शशिकांत कोळी.
*सांगोला :* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, उपशाखा सांगोला यांच्या वतीने सांगोला तालुका पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी युवराज निलख साहेब यांचा तसेच शिक्षणविस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब व अमोल भंडारी साहेब यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.
शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी हे शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. शिक्षकांच्या आस्थापनाविषयक कामांसह फंड प्रकरणे, वैद्यकीय देयके, सेवापुस्तके तसेच विविध प्रशासकीय अडचणी तत्परतेने आणि वेळेत मार्गी लावल्याबद्दल *वरिष्ठ लिपिक दत्तात्रय घाडगे सर, कनिष्ठ सहाय्यक रेश्मा चोरमले मॅडम, स्वाती कडलासकर मॅडम व पाटणे मॅडम* यांचाही शिक्षक समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
“शिक्षकांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने प्रतिसाद मिळाला, तर त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक बळ मिळते,” या भावनेतून करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत भाटेकर सर यांनी केले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अमोगसिद्ध कोळी सर, तालुकाध्यक्ष आबासाहेब पांढरे सर, शहराध्यक्ष सिताराम बुरांडे सर आणि सरचिटणीस दत्तात्रय शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षण विभाग आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना नूतन गटशिक्षणाधिकारी युवराज निलख साहेब यांनी सांगितले की, “शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्धपणे काम करू. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सदैव बांधील राहू.” त्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे उपस्थित शिक्षकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी अमोल भंडारी साहेब व लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब तसेच वरिष्ठ लिपिक दत्तात्रय घाडगे सर यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षक समितीने केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांचा सन्मान, प्रशासनाची संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. शिक्षकांच्या प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा केवळ सत्कार नसून त्यांच्या कार्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होती.
कार्यक्रमाच्या शेवटी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संतोष कांबळे सर यांनी आभार मानले. यावेळी सांगोला तालुका शिक्षक समितीचे नेते, पदाधिकारी, शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन,संचालक तसेच कार्यकर्ते शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्रशासनाची साथ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची बांधिलकी—या समन्वयातून सांगोल्याच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


إرسال تعليق