*शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..*
*शिवाजीराव खांडेकर यांच्या प्रयत्नांना यश..*
सांगोला प्रतिनिधी
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी उभारलेल्या लढ्याला, संघर्षाला यश आले असून, राज्यातील शिक्षिकेतर भरतीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून तसा अध्यादेश जारी केल्याने शिक्षिकेतर कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले.
पाच आगस्ट 2026 रोजी प्रधान सचिवा सोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर पद भरती चा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला व यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरू करण्यात आली व त्याच धर्तीवर अनेक वर्षापासून रिक्त शिक्षकेतर पदांची भरती तातडीने सुरू करावी याबाबत चर्चा झाली व शासनाने 11 ऑगस्ट रोजी पद भरती संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून भरती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली आहे, या निर्णयामुळे शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.
राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. व हा निर्णय म्हणजे केवळ एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा विजय नसून, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले. भरती प्रक्रियेमुळे शिक्षकेतर कर्मचारी वर्गात समाधानाची वातावरण पसरले आहे व या निर्णयाचे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.

إرسال تعليق