*रक्षाबंधनाचे औचित्य साधून शिवाजीराव जावीर यांच्यावतीने १०० महिलांना साडी वाटप


*


*सांगोला प्रतिनिधी -*


         रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून स्वाभिमानी होलार समाज संघटना, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या वतीने १०० गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


*हा कार्यक्रम  दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता दिपक आबा साळुंखे पाटील कार्यालय, सांगोला येथे होणार आहे.*


शिवाजीराव जावीर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. रक्षाबंधन असो, स्वतःचा वाढदिवस असो वा मुलाचा वाढदिवस असो, ते प्रत्येक सण आणि आनंदाचा क्षण समाजासोबत साजरा करतात. जुन्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना असो किंवा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व जेवण वाटप असे उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.


त्याच सामाजिक बांधिलकीतून बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त हा साडी वाटपाचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. हा कार्यक्रम केवळ प्रसिद्धीसाठी नसून मनापासून समाजसेवा करण्यावर  विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हूणन पूजा शिवाजीराव जावीर उपस्थितीत राहणार आहेत.तरी समाज बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم