*जिल्हा परिषद शाळा टोणेवाडी येथे साजरे केले अनोखे *रक्षाबंधन





* 

 

               *विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश; ३० झाडांचे केले वृक्षारोपण* 


*टोणेवाडी (प्रतिनिधी) -*


           जिल्हा परिषद शाळा टोणेवाडी येथे आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला.


वृक्ष हेच आपले खरे मित्र आहेत. वृक्षांमुळे पर्यावरणाचे रक्षण होते, हा संदेश देत शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधली व "आम्ही या वृक्षांचे रक्षण करणार" अशी शपथ घेतली. यावर्षी शाळेच्या आवारात सुमारे ३० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.


शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः हस्तनिर्मित राख्या तयार करून शाळेच्या आवारातील वृक्षांना बांधल्या. या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन पोळ सर यांनी केले.


या कार्यक्रमास पोलीस पाटील श्री. चंद्रकांत टोणे, अंगणवाडी सेविका आशा करे मॅडम व गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.


 *चौकट -* 

  *वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश* .

Post a Comment

أحدث أقدم