पत्रकार मिनाज खतीब यांच्या पाठपुराव्याला यश; कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी तात्काळ घेतली दखल
.
मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचे जाहीर आभार.!
सांगोला / तालुका प्रतिनिधी.
सांगोला शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. आगामी पैगंबर जयंती व रक्षाबंधन सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व खराब झालेल्या मार्गांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिक, वाहनचालक, महिला व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मिनाज खतीब यांनी वृत्तपत्रातून आवाज उठवत नगरपालिकेचे लक्ष वेधले होते.
या वृत्ताची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी स्वतः कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तात्काळ सर्वेक्षण करून खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. नगरपालिकेच्या या तत्पर भूमिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे नागरिकांनी स्वागत केले असून आगामी सण-उत्सवांपूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकार मिनाज खतीब यांनीही मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी शिवसेना (उ.बा.ठा) शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब. शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष फिरोज खतीब, राजू इनामदार, इंजि.मोईन इनामदार आदी उपस्थित होते.

Post a Comment