**एक ऐतिहासिक महामेळावा... एक अभूतपूर्व यश* 

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पुणे विभाग पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा यशस्वी संपन्न* !

=====================

 *सांगोला प्रतिनिधी :*


​     दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी मुक्ताई मल्टिपर्पज हॉल, कडलास रोड, सांगोला येथे पार पडलेला पुणे विभागाचा महामेळावा आपल्या सर्वांच्या अफाट उपस्थितीमुळे आणि दणदणीत सहभागाने ऐतिहासिक ठरला आहे!



​सांगोला हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला आहे, हे आज पुन्हा एकदा आपल्या लाडक्या शिलेदारांनी आणि तमाम शिक्षक बंधू-भगिनींनी सिद्ध करून दाखवले. या भव्य मेळाव्यासाठी राज्यभरातून आलेले शिक्षक समितीचे प्रमुख पदाधिकारी, पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचे व तालुक्यांचे आदरणीय पदाधिकारी आणि सांगोला तालुक्यातील प्रत्येक लढाऊ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शान वाढवली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!



​शिक्षकांच्या हक्कासाठी, मान-सन्मानासाठी आणि ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले नामवंत शिक्षण तज्ज्ञ तसेच सर्व मार्गदर्शक व पदाधिकाऱ्यांचेही आम्ही आभारी आहोत. आपल्या या अभूतपूर्व एकजुटीने आणि विक्रमी उपस्थितीने संघटनेच्या आगामी लढ्याला एक नवी ऊर्जा दिली आहे.

​हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सांगोला तालुका शिक्षक समिती परिवार यांचे विशेष आभार! असाच संघटित लढा भविष्यातही सुरू ठेवूया.

​आपले नम्र,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, उपशाखा सांगोला व शिक्षक समिती परिवार...

Post a Comment

Previous Post Next Post