*सांगोला तालुक्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा:- *परमेश्वर गेजगे*
*सांगोला तहसीलदार यांना दिले निवेदन* .
*सांगोला प्रतिनिधी*
सांगोला : सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे सांगोला तालुका अध्यक्ष परमेश्वर पांडुरंग गेजगे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सांगोला तालुक्यात एकूण १०३ गावे असून ७६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात मोठ्या जनावरांची संख्या सुमारे दीड लाखांच्या आसपास असून, शेळ्या व मेंढ्यांची संख्या सुमारे एक लाख आहे. एकूण जनावरांची संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. मोठ्या जनावरांना दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते, तर लहान जनावरांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे.
मोठ्या जनावरांना दररोज सुमारे २० किलो, तर लहान जनावरांना सुमारे ५ किलो चारा लागतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन हाच्यावरती तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात जनावरांसाठी तहसील कार्यालयासमोर बांधण्यात येतील अशा ठिकाणी चारा छावण्या सुरू करणे ही काळाची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीचा अहवाल लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी विनंती तहसीलदारांना करण्यात आली आहे.
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी हे निवेदन देण्यात आले.

Post a Comment