*नृसिंह तरुण गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद- उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे
नृसिंह तरूण गणेश मंडळाच्यावतीने गरजू कुटूंबाला शेळीचे वाटप*
*सांगोला (प्रतिनिधी):-*
गणेशोत्सव साजरा करण्यामागचा मूळ उद्देश जपत नरसिंह तरुण गणेश मंडळाने समाजाला एक वेगळी आणि उत्तम दिशा देण्याचे काम केले आहे.
मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करणे, लहान मुलांच्या उपचारासाठी शिबीर घेणे, गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करणे तसेच शेळी वाटपासारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. हे सर्व सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केले.
नृसिंह गणेश तरुण मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंडळाच्या 29 व्या वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत एका गरजू लाभार्थ्याला शेळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.शिवपुजे बोलत होते. सदर उपक्रमासाठी फॅबटेक फाउंडेशनचे सर्वेसर्वा व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, डॉ.प्रभाकर माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्याराणी सिध्देश्वर माळी यांना शेळीचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर युवा नेते विजय पैलवान, दैनिक माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के सर, सोमनाथ पैलवान उपस्थित होते.
श्री गणेशोत्सवाचे मूळ सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या नरसिंह तरुण गणेश मंडळाच्या कामाचे कौतुक करीत मंडळाच्या 29 व्या वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
या समाजोपयोगी उपक्रमांची दखल केवळ वृत्तपत्रांनीच नव्हे, तर अकोल्याचे जिल्हा न्यायाधीश आणि स्थानिक पोलीस स्टेशननेही घेतली आहे.पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणार्या गणराया अवॉर्ड्स आणि जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये वृक्षारोपण व समाजोपयोगी कामांना प्राधान्य दिले जाते.नरसिंह तरुण गणेश मंडळाला या उपक्रमांमध्ये नक्कीच यश व पुरस्कार मिळेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मस्के, उपाध्यक्ष प्रथमेश भुजबळ, खजिनदार संतोष लिगाडे, सचिव सौरभ शिर्के, अक्षय सपाटे, युवराज पैलवान,गोविंद पाटकुलकर, प्रवीण सादिगले, विनायक मस्के, अभिजीत राऊत, तुकाराम लिगाडे, रविकांत मस्के, मेजर मच्छिंद्र रसाळे, रुद्र लोले, अभी राऊत, संग्राम वाघमोडे, अण्णा शिर्के, प्रशांत शिर्के, रोहित शिर्के, सोहेल आतार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्ताविक सुनील पैलवान तर आभार प्रा.गणेश पैलवान यांनी मानले.









إرسال تعليق