*सांगोला  विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा - आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख*

 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, मदतीचे आश्वासन*

सांगोला प्रतिनिधी 

सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्प  झाले असून पावसाने मोठी ओढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.



           आमदार डॉ. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले. सांगोला तालुक्यासह मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.



           यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली 






.

Post a Comment

أحدث أقدم