*सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १०.०२ कोटी नफा*
*वार्षिक सभेत शिवाजी पाटील यांची माहिती : सभासदांना १० टक्के लाभांश*
*सांगोला प्रतिनिधी*
*सांगोला / सोलापूर :* सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता वृंदावनम् लॉन्स, एम.आय. जामगोंडी फार्म, जुळे सोलापूर येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये शिवाजी पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, संस्थेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात *१० कोटी ०२ लाख ८१ हजार* रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेकडे अहवाल सालअखेर *ठेवी २३५ कोटी ७४ लाख, भाग भांडवल ५९ कोटी ४५ लाख, गंगाजळी १४ कोटी ३० लाख* इतकी जमा असून संस्थेच्या १३ शाखा आहेत. प्रत्येक शाखेला संस्थेच्या अद्ययावत स्वतःच्या इमारती असून स्थावर व जंगम मालमत्तेच्या रूपाने आजअखेर ५ कोटी ४२ लाख रुपयांची संस्थेची मालमत्ता आहे.
तर ३१ मार्च २०२६ अखेर एन.पी.ए. (बुडीत कर्ज) साठी २ कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद संस्थेने केलेली असून कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण केवळ १.६९ टक्के आहे.
दिनांक ३१/०३/२०२६ अखेर संस्थेचे ६४४० सभासद असून अहवाल सालात १५६ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वाटप संस्थेने केले आहे.






Post a Comment