**समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सांगोला अध्यक्षपदी माननीय वसंतराव दिघे गुरुजींची निवड* 

*सांगोला प्रतिनिधी*  .

 दिनांक १/०९/२०२६ रोजी दुपारी बारा वाजता वार मंगळवार समर्थ जेष्ठ नागरिक संघाची मासिक मीटिंग संपन्न झाली ज्येष्ठ सदस्य रावसाहेब केदार साहेब यांची मार्गदर्शनाखाली सदर मीटिंग पार पडली.



        यावेळी समर्थ जेष्ठ संघाचे अध्यक्ष कैलासवासी नवनाथ भाऊ पवार यांचे निधन झाल्याने रिक्त पदी माननीय वसंतराव दिघे गुरुजी वाढेगाव यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली

       यावेळी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. अनिल कांबळे साहेब यांची निवड करण्यात आली. सचिव पदी माननीय अरुण वाघमोडे गुरुजी यांची निवड करण्यात आली खजिनदार बाळासाहेब बनसोडे तर सहसचिव पदी गंगाराम इमडे गुरुजी यांची निवड करण्यात आली वरील मान्यवरांचा सत्कार रावसाहेब केदार व जांगळे बापू यांचे हस्ते करण्यात आला.

           सत्काराला उत्तर देताना दिघे गुरुजी म्हणाले की या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे काम उत्तम प्रकारे करूया पुढील वर्षभराच्या काळात सांगोले व तालुक्यातील सर्व गावांमध्ये जेष्ठ नागरिकांची डोळ्याची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार माफक दरात चष्मे सर्व डोळ्यांचे आजारावर शस्त्रक्रिया करून लागेल ती मदत आपण पुणे येथील वासवानी ग्रुप मार्फत व समर्थ जेष्ठ नागरिक संघाच्या मदतीने करूया आज आपण त्यांचे शिबिर कार्यालय सांगोला येथे ठेवले आहे त्याचा लाभ सर्व ज्येष्ठांनी घ्यावा अशी आव्हान केले. 

          पुढील वर्षभराच्या काळामध्ये जर महिन्याच्या एक तारखेला पेन्शनर कार्यालय सांगोला वासुद रोड येथे डोळ्याची शिबिरे आयोजित करून मोफत औषध उपचार व शस्त्रक्रिया केली जातील तरी जेष्ठ आणि भाग घ्यावा यावेळी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे सभासद हजर होते

Post a Comment

Previous Post Next Post