*पारे गावात बेवारस मनोरुग्णाची हेळसांड, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव व पोलीस पाटलाच्या पुढाकाराने पंढरपूर अनाथ आश्रमात रवाना*
*सांगोला (प्रतिनिधी) -*
सांगोला तालुक्यातील पारे येथे गेल्या २० दिवसांपासून एक ४० वर्षीय अनोळखी बेवारस पुरुष मंदिराच्या परिसरात वास्तव्यास होता. त्याला स्वतःचे नाव, गाव, पत्ता काहीच सांगता येत नसून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या व्यक्तीची दयनीय अवस्था पाहून पारे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजु जाधव यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला.
त्यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष *जगन्नाथ गायकवाड*, सरपंच आणि ग्रामसेवक *जोंधळे भाऊसाहेब यांच्या सहकार्याने पंढरपूर येथील *बेइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित पंढरपूर अनाथ आश्रमास* पत्रव्यवहार केला.
*दि. २७/०९/२०२६* रोजीच्या पत्रानुसार त्या व्यक्तीच्या घरच्या / कुटुंबीयांचा शोध लागेपर्यंत त्याला तात्पुरता आधार व आश्रय देण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्रावर पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक आणि दोन साक्षीदार यांच्या समक्ष
सदर व्यक्तीला पोलीस पाटील व गावकृती समितीच्या जबाबदारीवर आश्रमात पाठविण्यात येणार असून, आश्रम प्रशासनाकडून त्याची देखभाल व सुरक्षित निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.
*कोण ओळखत असाल तर संपर्क साधा -*
या फोटोतील व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास पारे गावचे पोलीस पाटील विजय गुजले - *७७०९४६४८२४* यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







Post a Comment