*सांगोला बस स्थानकावर जनावरांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर*

*आगर प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये संताप; उपाययोजना करण्याची मागणी*

*सांगोला प्रतिनिधी* .

            *सांगोला -* सांगोला बस स्थानकावर सायंकाळच्या वेळी जनावरांचा मुक्त संचार वाढला असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी जनावरे वावरताना दिसत आहेत. याकडे बस स्थानकाचे आगर प्रमुख व संबंधित यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.



          प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी गर्दीच्या वेळेत स्थानकाच्या फलाटावर आणि प्रवासी शेडमध्ये गुरे, कुत्री यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रवाशांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांजवळच ही जनावरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.



       याबाबत आगर प्रमुखांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. जनावरांना रोखण्यासाठी गेटवर कर्मचारी नियुक्त करणे किंवा कुंपण घालणे अशी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित केलेली दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.



      यदाकदाचित या मुक्त जनावरांकडून प्रवाशांना धक्का लागून किंवा चावा घेऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



 विशेष चौकट

*प्रवासी काय म्हणतात...*

> "बस स्थानक हे प्रवाशांसाठी असते की जनावरांसाठी असा प्रश्न पडतो. संध्याकाळी बसायला जागा नसते, कारण तिथे जनावरे बसलेली असतात. यावर आगर प्रमुखांनी तातडीने लक्ष द्यावे."

> *- एक प्रवासी*



*प्रशासनाने करावयाच्या उपाययोजना :*

1.  बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जनावरांना अटकाव करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे.

2.  स्थानक परिसरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेच्या मदतीने मोहीम राबवणे.

3.  सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवून संबंधितांवर कारवाई करणे.

4.  प्रवाशांच्या तक्रारीसाठी तक्रार पेटी व हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावणे.

Post a Comment

أحدث أقدم