*सांगोला सराफ असोसिएशनचा मोठा निर्णय*

*२९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत सर्व दुकाने बंद राहणार*

सांगोला प्रतिनिधी 

*सांगोला, ता. २३ :* दरवर्षीप्रमाणे यंदाही पक्ष पंधरवडा निमित्त सांगोला शहरातील सर्व सराफ दुकाने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सांगोला सराफ असोसिएशनने घेतला आहे.



सांगोला सराफ असोसिएशनच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनेनुसार, दि. २९ सप्टेंबर २०२६ ते दि. ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सांगोला शहरातील सर्व सराफाची दुकाने बंद राहतील.



याची सर्व व्यापारी बांधवांनी व ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मिसाळ यांनी केले आहे



पक्ष पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून ग्राहकांनी आपल्या खरेदीचे नियोजन त्यानुसार करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post