सामाजिक ऐक्याचे आदर्श ठरलेले प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाच्या कार्याचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांच्याकडून गौरव.
जुने मारुती मंदिर येथील श्री गणरायाची डी. वाय.एस.पी शिवपूजे यांच्या हस्ते आरती संपन्न.
सांगोला / तालुका प्रतिनिधी.
सांगोला शहरातील जुने मारुती मंदिर येथील प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाने गेली अनेक दशके सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाची परंपरा अखंडपणे जोपासत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मंडळाच्या कार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. बसवराज शिवपूजे यांनी विशेष कौतुक केले.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी डॉ. शिवपूजे यांनी शुक्रवार दि.१८ रोजी मंडळास भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे असे उपक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकारामतात्या गुळमिरे, प्रदीप गुळमिरे,अरविंद डोंबे गुरुजी, रमेश लोखंडे,अमर गुळमिरे सर,भारत घोंगडे, म. वी. सभेचे ता. अध्यक्ष मा. रत्नाकर पाटणे,मा. आनंद घोंगडे,मनोज उकळे सर मा.नगरसेवक सोमेश यावलकर मा.नगराध्यक्ष चंदन होनराव, महेश गुळमिरे, संजय कोठावळे,राहुल पाटणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डि.वाय.एस.पी डॉ. शिवपूजे म्हणाले की, प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाने केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते कार्य मर्यादित ठेवले नाही, तर सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि बंधुभावाची परंपरा जोपासून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विविध धर्मांच्या नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा टिकविण्याचे मंडळाचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
विशेष बाब म्हणजे मंडळाच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्र उत्सव सोबतच मुस्लिम बांधवांचा मोहरम उत्सवही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. मोहरमचे डोले (ताबूत) तसेच सवारी (पंजे) बसविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अखंड सुरू असून,या परंपरेचे मानकरी लिंगायत समाजातील बांधव आहेत. विविध धर्मीय समाजघटकांच्या सहभागातून जपली जाणारी ही परंपरा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण म्हणून ओळखली जाते.
सांगोला शहरात गणेशोत्सव नवरात्र उत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण परस्पर सहकार्य, आदर आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरे होतात. त्यामध्ये प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत असल्याने नागरिकांकडूनही मंडळाचे कौतुक होत आहे.
यावेळी शिवप्रेमी मंडळ चे अध्यक्ष बापूसाहेब भाकरे,अरविंदभाऊ केदार,जितू साळुंखे यांनी तर शांतता कमिटी च्या वतीने बापूसाहेब ठोकळे पत्रकार मिनाज खतीब,नासिर खतीब, शशिकांत कोळी,राजू इनामदार,फिरोज खतीब यांनी तसेच
महात्मा बसवेश्वर महाराज युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुमित चांदणे, काशिनाथ ढोले, संतोष महिमकर,प्रसाद जिरगे, निलेश लांमगुंडे, आकाश घोंगडे, सिताराम महिमकर, शिवानंद लोखंडे,अक्षय महिमकर,अजित गुळमिरे,नितीन बुंजकर, सुरज चांदणे,आकाश लोखंडे, शिवानंद लोखंडे,श्रीकांत गुळमिरे, जय गुळमिरे, श्रवण गुळमिरे यांनी डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपूजे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१) चौकट:-
सर्वधर्म समभावाचा संदेश.!
प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्र उत्सव बरोबरच मोहरम उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. मोहरमचे डोले (ताबूत) आणि सवारी (पंजे) बसविण्याची जबाबदारी वीरशैव लिंगायत समाजातील बांधव पार पाडतात. विविध धर्मीय समाजघटकांचा सहभाग, परस्पर आदर आणि सामाजिक ऐक्य यामुळे ही परंपरा सांगोल्याच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.










إرسال تعليق