*द जर्नलिस्ट असोसिएशनची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रदेशाध्यक्षपदी अजित गायकवाड, तर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शशिकांत कोळी* 

*प्रतिनिधी अक्षय महामुनी* 

सोलापूर, ता. १७ - दि जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडियाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रामदासजी ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश व सोलापूर जिल्हा कार्यकारणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.



    बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कडलास (ता. सांगोला) येथील *अजित गायकवाड* यांची, तर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी घेरडी (ता. सांगोला) येथील *शशिकांत कोळी* यांची एकमताने निवड करण्यात आली.


  याशिवाय पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी विजयाताई करनवर (जेऊर, ता. करमाळा), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (ब विभाग) पदी पवन कुमार पुठ्ठेवार, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद शफी सरदार पटेल, जिल्हा उपाध्यक्षपदी सुहास हजारे, जिल्हा सचिवपदी प्रदीप उड्डानशू, सोलापूर शहराध्यक्षपदी दत्ता जाधव, शहर उपाध्यक्षपदी प्रसन्न दिवटे तर शहर सचिवपदी सुहास हजारे यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



 या बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या अडचणी प्रश्नावर विषयी चर्चा करण्यात आली पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी डॉ.रामदासजी ताटे यांनी योग्य माहिती सांगितली.


 नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post