संतोष साठे यांची सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी पत्रकार संतोष साठे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष साठे यांनी स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेच्या विविध समस्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर सांगोला तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.



संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार महासंघाचे कार्य सांगोला तालुक्यात अधिक प्रभावीपणे वाढेल, तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक हिताच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



द जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित गायकवाड पाटील यांनी संतोष साठे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



शुभेच्छुक :राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदासजी ताटे साहेब

 अजित गायकवाड पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघ. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत कोळी



Post a Comment

أحدث أقدم