*श्रीमती सुनिता शेटे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न..*

*सुनिता शेटे यांचे महावितरण मध्ये पारदर्शक व तत्पर सेवा.. उपकार्यकारी अभियंता स्वानंद शिंदे*


सांगोला प्रतिनिधी 

     श्रीमती सुनिता शेटे यांनी महावितरण मध्ये 17 वर्षे प्रदीर्घकाळ सेवा करताना अत्यंत चोख, पारदर्शक व कोणतेही कारवाई न होता अविरतपणे सुंदर सेवा देऊन आदर्श निर्माण केला व त्यामुळे त्यांचे काम वाखाणण्याजोगे  आहे व यापुढे त्यांनी आरोग्याची काळजी घेऊन उत्साही जीवन जगावे व मला आजच्या या सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे मत उपकार्यकारी अभियंता स्वानंद शिंदे अकलूज यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मत व्यक्त केले. 


    श्रीमती सुनिता भारत शेटे मॅडम यांनी महावितरण मध्ये 17 वर्षे प्रदीर्घ सेवा देऊन प्रधानतंत्रज्ञ या पदावरून सेवानिवृत्त झाल्या त्याबद्दल त्यांचा पाटीदार भवन अकलूज येथे अकलूज महावितरण सेक्शन, यशवंत नगर सेक्शन, माळीनगर सेक्शन, विझोरी सेक्शन, लवंग सेक्शन, शिवशंकर वीज कामगार पतसंस्थेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.


 यावेळी शाखा अभियंता सुहास शिंदे, जनमित्र हरी माने, पत्रकार रविराज शेटे, सौ. प्रीती फिरमे शेटे, महावितरणच्या अंजना जाधव, स्वाती जाधव, सुरज सोनवणे, सुरेश वसेकर यांनी शेटे मॅडम यांच्या सेवेचा गुणगौरव करून अत्यंत चोख, व पारदर्शी काम केले व म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले. सदर प्रसंगी पैलवान अजित तोरसकर, शिवशंकर पतसंस्थेचे सुभाष माने, मंगला कंड्रे, राजश्री खरात, राजकुमार भोईटे, वसंत वाघ, गणेश शिंदे, शेख साहेब, अमोल पाटील, घनश्याम फिरमे, मंगला जाधव,, जयश्री जाधव, अंजना जाधव, स्वप्निल शेटे, सौ. पूजा शेटे, अभिजीत ढोले, सौ. अंबिका कानडे, सौ. साधना तोडकर, श्रीमती सुनंदा ढोले, श्रीमती सुरेखा साखरे, सौ. ऐश्वर्या साखरे, महावितरण चे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुदीप कांबळे यांनी सुरेख केले तर आभार हरी माने यांनी मानले.


    *महावितरण मधून सतरा वर्षे प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त  होताना माझ्यासाठी ही निवृत्ती नसून एका वेगळ्या पर्वास सुरुवात होत आहे असे वाटते तर पारदर्शक व चोख कामामुळे वरिष्ठांचा विश्वास व कुटुंबाची साथ, कर्मचाऱ्यांची साथ त्यामुळे सेवा चोख व सुरळीतपणे करता आली हे माझे भाग्य समजते..*

*श्रीमती सुनिता भारत शेटे*

*महावितरण प्रधान तंत्रज्ञ


Post a Comment

أحدث أقدم