*"जनमाणसाचा अरुण भाऊ" - दिवंगत अरुण (भाऊ) रुपनर* जन्मापासून : शेवटपर्यंत फक्त लोकसेवा
*जन्म : १ ऑक्टोबर १९६४ | स्मृती : १९ ऑगस्ट २०१९ |*
सांगोला तालुक्याच्या राजकारणात पदाने नाही तर कार्याने मोठी झालेली नावे बोटावर मोजण्याइतकी आहेत. माजी पंचायत समिती सदस्य घेरडी, माजी सरपंच मेडशिंगी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा तालुकाध्यक्ष दिवंगत अध्यक्ष अरुण (भाऊ) रुपनर हे त्या यादीत अग्रस्थानी आहेत.
*बाळासाहेबांच्या कसोटीत खरे ठरलेले*
शिवसेना भवनातील तो किस्सा आजही सांगितला जातो. बाळासाहेबांनी विचारले "कोण खरं बोलतंय?" सर्व गप्प असताना एकट्या अरुण भाऊंनी हात वर केला. "गेट आऊट" म्हणताच भाऊ दरवाज्याकडे गेले, पण बाळासाहेबांनी थांबवून म्हणाले "तू खरं बोललास, तूच प्रामाणिक आहेस. तू खूप मोठा होणार." त्यानंतर बाळासाहेबांशी थेट फोनवरून, प्रत्यक्ष भेटीचा संपर्क कायम राहिला. सेना भवनात त्यांना कोणी अडवत नसे.
*घेरडी - शिवसेनेचा बालेकिल्ला*
१९९० मध्ये घेरडी महादेव मंदिरात आप्पा सरगर, तुकाराम औताडे , चिदानंद स्वामी, संतोष माने, बटू पोळ, पपू सावंत, तानाजी दसवत, अशोक कोळी, संतोष ककमरे, घोरपडे मेजर,२५० शिवसैनिकांनी पिंडीवर हात ठेवून शपथ घेतली आणि सांगोला तालुक्यात शिवसेनेच्या शाखा बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
*प्रशासनात दबदबा आणि दरारा*
भाऊंची खरी ओळख म्हणजे "जिथं लाथ मारील तिथं पाणी काढीन". पोलीस स्टेशन, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात त्यांचा प्रचंड मान-सन्मान आणि दबदबा होता. सामान्य माणसाचे काम अडले की अधिकारी त्यांच्या एका शब्दावर काम करायचे. ही दहशत नव्हती, तर काम करून घेण्याची धमक होती.
*स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना केलेले ऐतिहासिक कार्य*
अनेक नेते सत्तेत असताना गप्प बसतात, पण भाऊंनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी सर्वात मोठे योगदान दिले.
- *म्हैसाळ योजना तसेच सांगोला उपसा सिंचन योजना उजनी तून पाणी मिळण्यासाठी* यामध्ये ही अग्रेसर होते
- *शिरभावी योजना:* शिरभावी योजनेच्या मूळ मंजुरीसाठी त्यांचा मोठा वाटा होता.
आणि नंतर विरोधी सरकार आल्यावर याच योजनांचा निधी मिळावा म्हणून त्यांनी तहसीलवर भव्य मोर्चे काढले. सत्तेत असताना मंजुरी, विरोधात असताना निधीसाठी लढा - हेच खरे नेतृत्व.
- घेरडी व मेडशिंगी आश्रमशाळा मंजूर करून सुरू केल्या.
- *वाकी शिवणे येथील शाळा मंजूर करून बाळासाहेब काटकर यांच्याकडे सुपूर्द के.ली,.*
- *मंगळवेढा, शिरशी, गावातील शाळा मंजूर करून काका गायकवाड यांना दिली.* असेच अनेक कामं त्यांनी केली आपल्या तालुक्यापुरते न पाहता जिल्हाभर शिक्षण पोहोचवले.
- मानेगाव येथे दुध डेअरी मंजूरी
- मेडशिंगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरी, पशुवैद्यकीय दवाखाना मंजूरी, ग्रामपंचायत गाळे मंजूर करून एक - ज्यातून सांगोला तालुक्यात गाळे पद्धत सुरू झाली.
- खिलारवाडी कोळी वस्तीचा वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता २००४ मध्ये एका दिवसात खुला करून दिला. असं अनेक रस्त्यांची व इतरही कामं एका दिवसात केलीत.
*राजकीय प्रवास*
मानेगाव ग्रामपंचायत, मेडशिंगी सरपंच (२०००), वाणी-चिंचाळे पूर्ण पॅनल, २००२ मध्ये घेरडी गणातून पंचायत समिती - पैशाने बलाढ्य विरोधकाला पाडून विजय. २००४ मध्ये बाळासाहेबांनी त्यांना सोलापूर उपजिल्हाप्रमुख केले.
२००९ मध्ये सांगोला विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळावे अशी सर्व शिवसैनिकांची मागणी होती. तिकीट न मिळाल्याने झालेली नाराजी आजही सैनिकांच्या मनात आहे.
*आजची खंत*२०१९ नंतर बॅनरवर, कार्यक्रमात त्यांचा फोटोही दिसत नाही फक्त निवडणूकी पुरता फोटोचा वापर अन् लोकांन मध्ये मतदान मागण्यासाठी फक्त नावाचा वापर पण भर सभेत अजिबात नाव न घेणं. ज्या माणसाने सांगोला तालुक्यात शिवसेना वाढवली, त्याला योग्य स्थान मिळाले नाही, अशी भावना प्रत्येक जुन्या शिवसैनिकाची आहे. पण सांगोला तालुक्यातील शेतकरी आजही म्हणतो - "भाऊ असते तर हे काम झालं असतं."
अशा या लोकनेत्यास जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
*- शशिकांत कोळी, घेरडी. ता. सांगोला, जि. सोलापूर.*
*संपर्क : 7755986379*















إرسال تعليق