*लोहार समाजाच्या २१ प्रलंबित मागण्यांसाठी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन; नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचा जाहीर पाठिंबा*
*सांगोला (प्रतिनिधी) -*
सकल लोहार समाजाच्या प्रलंबित २१ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष मा. श्री. दादासाहेब कळसाईत यांनी दि. २ ऑक्टोबरपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ, महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
या संदर्भातील पाठिंब्याचे पत्र नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे सांगोला तालुका अध्यक्ष *रघुनाथ ज. गुजले (रा. हंगिरगे, ता. सांगोला)* यांनी पंढरपूर येथे जाऊन आंदोलनकर्ते दादासाहेब कळसाईत यांना दिले.
*पत्रात म्हटले आहे की,* "लोहार समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेले हे लढा केवळ एका समाजाचा नसून वंचित घटकांचा आवाज आहे. या लढ्याला आमच्या मंडळाचा पूर्ण पाठिंबा आहे."
सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देणाऱ्यांमध्ये -
*१) बापू गुजले, २) दयाराम गुजले, ३) संतोष जाधव, ४) सिद्ध गुजले, ५) उषा किरोते मॅडम, ६) विजय गुजले, ७) दादा गुजले, ८) सागर भुमगर* तसेच श्रीकांत शिंदे, संतोष पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आल्याचे रघुनाथ गुजले यांनी सांगितले.
*दिनांक - ०३/१०/२०२६*
*स्थळ - भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (मुख्य कार्यालय)*







Post a Comment