*पारे विकास सोसायटीचा वाद संपला! ७ संचालकांच्या बहुमताला न्याय, मधुकर गोरड यांची DCC बँक मतदार यादीत वर्णी*



सांगोला प्रतिनिधी- शशिकांत कोळी..

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व देखरेख संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर पुणे विभागाने पडदा टाकला आहे.


सोलापूर DCC बँक सन २०२४-२९ च्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी पाठवण्यासाठी पारे सोसायटीची संचालक मंडळाची सभा दि. ०२/०९/२०२६ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आली. या सभेत एकूण १३ पैकी ७ संचालकांनी बहुमताने ठराव मंजूर करून बँकेसाठी श्री. मधुकर म्हाकू गोरड आणि देखरेख संघासाठी श्री. सौदागर बाबासाहेब जाधव यांची निवड केली.


या निर्णयाविरोधात विद्यमान चेअरमन श्री. धनाजी शामराव गायकवाड गटाचे संचालक श्री. भाऊसो तात्या गायकवाड व इतर २ संचालकांनी सहाय्यक निबंधक, सांगोला यांच्याकडे तक्रार दाखल करून सभा बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.


त्यावर सहाय्यक निबंधक डॉ. वेशाळे यांनी दि. १०/०९/२०२६ रोजी स्पष्ट आदेश देत सांगितले की, "दि. ०२/०९/२०२६ ची सभा महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० व नियम १९६१ नुसार वैध आहे. १३ पैकी ७ संचालकांचे बहुमत असल्याने ठराव वैध व कायम करण्यात येत आहे. चेअरमनची हरकत फेटाळण्यात येत आहे."


त्यानंतर विरोधी गटाने पुणे विभागीय निवडणूक अधिकारी श्री. दिग्विजय आहेर यांच्याकडे हरकत घेतली. दि. ०७/१०/२०२६ रोजी झालेल्या सुनावणीनंतर अंतिम आदेशात हरकत अर्ज क्र. ०५/२०२६ मान्य करून पारे सोसायटी व प्रतिनिधी श्री. मधुकर गोरड यांचे नाव बँकेच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


या निकालामुळे ७ संचालकांच्या बहुमताचा विजय झाला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post