मंगळवेढ्यात खरेदीखतात ६.७५ लाखांचा महाघोटाळा; 'शेती झोन' लपवून बनावट दाखल्याद्वारे शासनाची फसवणूक:



!

भ्रष्ट अधिकाऱ्यांसह खरेदीदार, विक्रीदार, दस्त लेखक अन् साक्षीदारांवर थेट 'फौजदारी' दाखल करा; १ सप्टेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर युवासेनेचे 'बेमुदत धरणे आंदोलन


'मंगळवेढा, दि. २९ (प्रतिनिधी) 


-मंगळवेढा येथील गट नं. ४३४७/३/अ मधील ६ गुंठे जमिनीच्या खरेदीखतामध्ये शासकीय यंत्रणेच्या संगनमताने ६,७५,०००/- रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार करून मोठा भ्रष्टाचार आणि बनावटगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख श्री. अरविंद ज्ञानेश्वर नाईकवाडी व मंगळवेढा शहरवासियांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

  या घोटाळ्यात सामील असलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांपासून ते खरेदीदार, विक्रीदार, दस्त लेखक आणि साक्षीदारांपर्यंत सर्वांवरच नावानिशी थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नगर रचना विभाग सोलापूर शाखेने सदर जमिनीबाबत स्पष्टपणे "शेती वापर विभाग" नमूद असलेला दाखला जारी केला होता. परंतु, खरेदीखतामध्ये बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी हा मूळ दाखला पूर्णपणे लपवून ठेवण्यात आला. त्यावर खाडाखोड करून तो "रहिवासी दाखला" म्हणून भासवून अत्यंत गंभीर स्वरूपाची बनावटगिरी (दस्त क्र. ४२८०/२०२६, दिनांक ११/०८/२०२६) करण्यात आली आहे. याचे पक्के आणि मूळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा युवासेनेने केला आहे.या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी:या महाघोटाळ्यात शासकीय यंत्रणेची फसवणूक करून बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळवण्यासाठी सर्वांनी संगनमताने कट रचल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

      त्यामुळे युवासेनेने कोणालाही न सोडता खालील सर्वांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे:भ्रष्ट व लाचखोर शासकीय अधिकारी: 'शेती विभाग' झोन दाखला बदलून बनावट 'रहिवासी दाखला' वापरला जात असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, मोठी आर्थिक लाच स्वीकारून बेकायदेशीर दस्त नोंदवून घेणाऱ्या महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या' अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.खरेदीदार आणि विक्रीदार: ६,७५,०००/- रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दस्त लिहून घेणाऱ्या (खरेदीदार) आणि दस्त लिहून देणाऱ्या (विक्रीदार) सर्व भागीदारांवर गुन्हे दाखल व्हावेत.दस्त लेखक आणि साक्षीदार: हा खोटा व बनावट दस्त तयार करणारा दस्त लेखक आणि या बेकायदेशीर व्यवहाराला मान्यता देणारे दोन्ही साक्षीदार यांची नावे निष्पन्न करून, त्यांना या कटात भागीदार धरून नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८२ नुसार थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.फेरफार रद्द करा; अन्यथा १ सप्टेंबरपासून 'बेमुदत धरणे आंदोलन'या बनावट पुराव्यांवर आणि लाचखोरीवर आधारित असलेला फेरफार क्रमांक ४५३३६ तातडीने आणि कायमचा रद्द करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

  "सदर प्रकरणात १ सप्टेंबर २०२६ पूर्वी दोषींवर गुन्हे दाखल करून फेरफार क्र. ४५३३६ स्थगित किंवा रद्द न केल्यास, ०१ सप्टेंबर रोजी मंगळवेढा प्रांत कार्यालय बाहेर तीव्र 'बेमुदत धरणे आंदोलन' सुरू करण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील," असा कडक अल्टिमेटम युवासेना शहरप्रमुख अरविंद नाईकवाडी यांनी दिला आहे. या निवेदनाचा थेट शिक्का मंगळवेढा दुय्यम निबंधक कार्यालयाने घेतला असून, या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post