*सांगोला येथे कुबेर हेल्थ फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन* 


 *आरोग्य जनजागृतीसह वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गोशाळा व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना मिळणार नवी दिशा*


 *सांगोला प्रतिनिधी* 


सांगोला : मुंबई येथे मुख्यालय असलेल्या कुबेर हेल्थ फाउंडेशन, नवी मुंबई यांच्या सांगोला संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम शिंगाडे, खजिनदार सचिन हातेकर तसेच दिनेश कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनच्या सहसचिव रंजनाताई कांबळे, सल्लागार व कार्यक्रमाच्या आयोजिका जयश्री सावंत तसेच महिला शाखेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

कार्यक्रमास श्रीमती वाघ मॅडम, सुषमा नवघरे मॅडम, कांबळे मॅडम, लक्ष्मी गेजगे मॅडम, नंदा वाघमारे मॅडम, प्रभा चंदनशिवे मॅडम, संध्या काटे मॅडम, राखी मॅडम यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कुबेर हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यधाम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गोशाळा आणि निसर्गोपचार अशा विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य केले जात आहे. समाजातील गरजू घटकांना मदत मिळावी, आरोग्याविषयी जनजागृती व्हावी तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, या उद्देशाने संस्थेचे उपक्रम सुरू आहेत.

“कुबेर हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला परिसरात आरोग्यविषयक जनजागृती आणि सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे व गतीने सुरू राहील,” असा विश्वास संस्थापक अध्यक्ष उत्तम शिंगाडे यांनी यावेळी व्यक्त केला.

सांगोला येथे संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना संस्थेच्या विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा अधिक चांगला लाभ मिळणार असून, सामाजिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post