*सांगोल्यात हिंदवी स्वराज्य अर्बन महिला क्रेडिट सोसायटी व सुटिंग-शर्टिंग फर्मचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न होणार*
*सांगोला (प्रतिनिधी) -*
सांगोला शहरात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या *हिंदवी स्वराज्य अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सांगोला* आणि *हिंदवी स्वराज्य सुटिंग व शर्टींग* या दोन प्रतिष्ठानांचा संयुक्त उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा *शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता* सांगोला येथील पाटील कॉम्प्लेक्स जय गणेश मॉल समोर वाढेगाव नाका, सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे.
*मान्यवरांची उपस्थिती -*
या सोहळ्याचे शुभहस्ते उद्घाटन *मा. आ. शहाजीबापू पाटील (माजी आमदार)* यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मा. आ. डॉ. बाबासाहेब देशमुख (आमदार, सांगोला)* हे भूषवणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून *दिपकआबा साळुंखे-पाटील (माजी आमदार), अनिकेत देशमुख (अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ), आनंदा माने (नगराध्यक्ष, सांगोला), नितीन इंगोले (उपनगराध्यक्ष), मारुती (आबा) बनकर (माजी नगराध्यक्ष), चेतनसिंह केदार-सावंत (सभापती, शिक्षण व आरोग्य), अतुल पवार (जि. प. सदस्य), पुनमताई इंगवले (सभापती, पंचायत समिती), दादासाहेब लवटे (जि. प. सदस्य), प्रबुद्धचंद्र झपके,( अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला ),भाऊसाहेब रुपनर ( फॅबटेक उद्योग समूह ), प्रभाकर माळी (चेअरमन सूतगिरणी )सागर पाटील (शिवसेना संपर्कप्रमुख), पियूष पाटील (युवा नेते), सतीश सावंत (संपादक दैनिक सांगोला नगरी व दैनिक माणदेश नगरी), अरुण पाटील ( नगरसेवक ), अनिल इंगोले (सूर्योदय उद्योग समूह ), अजय सरगर (उपसभापती पंचायत समिती), रमेश जाधव( चेअरमन खरेदी-विक्री संघ, नगरसेवक ), डॉ. अवधूत काशिद (स्त्रीरोग तज्ज्ञ), नवनाथ शिनगारे (परीक्षा लॅब सांगोला), दीपक बंद्रे( संस्थापक विठ्ठल मल्टीस्टेट), विजय इंगवले (संस्थापक संभाजीराव शेंडे महाविद्यालय), मारुती माळी (ब्रम्हा उद्योग समूह ), जुबेर मुजावर (नगरसेवक/ सीए), बाळासाहेब एरंडे (उद्योगपती ), अमर गोडसे (संस्थापक रत्नप्रभू अर्बन), विवेक पाटील (नगरसेवक), तानाजी काका पाटील (मार्गदर्शक), प्रशांत धनवजीर( नगरसेवक), डॉ. सोमेश यावलकर (नगरसेवक), माऊली तेली (नगरसेवक), दिपक खटकाळे( तालुका प्रमुख युवासेना ), अशोक पाटील (उद्योगपती), अक्षय महामुनी (उदयोगपती / पत्रकार ),( बाळासाहेब आसबे उद्योगपती), डॉ.भारत गरंडे (संस्थापक मेट्रिक ग्लोबल अर्बन सांगोला), अरुण पाटील (शिवलोचना उद्योग समूह), पांडुरंग पाटील (पांडुरंग उद्योग समूह), अमरसिंह गोसावी (सह. सहकारी अधिकारी)* आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दर्जेदार कापड, सुटिंग-शर्टिंगसाठी ब्रँडेड व्हरायटी आणि महिलांसाठी बचत व कर्ज योजनांच्या माध्यमातून ही दोन्ही दालने ग्राहकांच्या सेवेत असतील. तरी सांगोला तालुक्यातील नागरिक, व्यापारी, हितचिंतक व महिला भगिनींनी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक सुशांत मोरे, सह संस्थापक हर्षल कोळी, चेअरमन माधवी मोरे व्हाईस चेअरमन चतुरा कोळी संचालिका इंदुमती साळुंखे, संचालिका अश्विनी पाटील,प्रदीप मोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.




إرسال تعليق