घेरडी येथे अरुणोदय गणेश तरुण मंडळातर्फे हरीकीर्तनाचे आयोजन
ह. भ. तुळशीराम महाराज रसाळ यांचे सुतार गल्ली येथे हरी कीर्तन.
सांगोला प्रतिनिधी :-
येथील सुतार गल्लीतील अरुणोदय गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त हरीकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (ता. १८) रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. तुळशीदास महाराज रासळ (तात्या) यांचे हरीकीर्तन होणार आहे.
सुतार गल्ली, घेरडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अरुणोदय गणेश तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात येत आहे.



إرسال تعليق