*स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्यावतीने शेकडो महिलांना मोफत देवदर्शन*

*माचनूर, अक्कलकोट, गाणगापूर व तुळजापूर दर्शनाचा महिलांनी घेतला लाभ*

शिवाजीराव जावीर यांच्या संकल्पनेचे कौतुक.



*प्रतिनिधी अक्षय महामुनी* 

  दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या संकल्पनेतून श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शेकडो महिलांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यात आले.


यावेळी माचनूर, अक्कलकोट, गाणगापूर व तुळजापूर या धार्मिक स्थळांचे महिलांना दर्शन घडविण्यात आले. श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या या देवदर्शन उपक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देवदर्शनाचा लाभ घेतला. मोफत देवदर्शनाची व्यवस्था केल्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.


  स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या माध्यमातून यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना साडी वाटप, गोरगरिबांना अन्नदान तसेच सामाजिक बांधिलकीतून गरजू नागरिकांना आधार देण्याचे काम संघटनेने केले आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठीही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.



.

Post a Comment

أحدث أقدم