*जेऊर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संप्पन*
जेऊर प्रतिनिधी विजया कर्णवर
दिनांक 21सप्टेंबर 2026रोजी जेऊर येथे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जेऊर च्या संचालिका Bk आश्विनी दीदी व द जर्नालिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा व सत्याचा लढा महाराष्ट्र प्रतिनिधी विजया कर्णवर यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तसेच आरोग्यविषयक आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा मोफत करून देणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमास डॉ. प्रवीण बधे सर,यांच्या मार्गदर्शना खाली राजेंद्र बाळे सर, भागवत गोरे सर, सतीश बाबर सर, दिलीप किर्वे सर, योगेश बोराडे सर, इत्यादींचे सहकार्य लाभले.यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.अशा आरोग्यविषयक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले. शेवटी संचालिका Bk. अश्विनी दीदी यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला.




Post a Comment