*शिवसेना ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी प्रियांका विक्रम वाघमारे

 या

 *सातारा प्रतिनिधी* 

*सातारा :* वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणीत ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाच्या *सातारा जिल्हा अध्यक्ष (महिला) पदी (कार्यक्षेत्र - सातारा जिल्हा) सौ. प्रियांका विक्रम वाघमारे* यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीचे पत्र शिवसेना ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभाग, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष *ॲड. डॉ. पी. बी. कुंभार* यांनी दिले आहे. जावक क्र. OBC/SAT/2026/051, दिनांक 11/08/2026 रोजी हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.


सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. तथापि, वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यात बदल करण्यात येऊ शकतो, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे


Post a Comment

أحدث أقدم