*सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, शहादा तालुका, जि. नंदुरबार* यांच्या वतीने आयोजित

*⚖️ कायदेविषयक मार्गदर्शन मेळावा व पदनियुक्ती पत्र वाटप समारंभ* 



*प्रतिनिधी अक्षय महामुनी* 

सराफ बांधवांच्या व्यवसायाशी संबंधित कायदेशीर बाबी, व्यवसायातील सुरक्षितता, संरक्षणात्मक उपाययोजना, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया, सोने-चांदीच्या दरातील घडामोडी, बाजारपेठेचे विश्लेषण तसेच सराफ बांधवांच्या विविध अडचणी व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे.



तसेच सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.



*📅 दिनांक : रविवार, २७ सप्टेंबर २०२६*

*⏰ वेळ : सकाळी १०:३० वाजता*

*📍 स्थळ : श्री साई मंगल कार्यालय, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार*



महाराष्ट्रातील सर्व सराफ, सुवर्णकार व संलग्न व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमास सहकार्य करावे, ही नम्र विनंती.



*आपली उपस्थिती हीच आपल्या एकजुटीची ताकद आहे !*




*🙏 सस्नेह निमंत्रक 🙏*

*सराफ सुवर्णकार संरक्षण समिती,*

*शहादा तालुका, नंदुरबार जिल्हा.


Post a Comment

أحدث أقدم