*┏━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┓*
*┃ ★ भिलवडीच्या सुनेने मिळविले घवघवीत यश ★ ┃*
*┗━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┛*
*पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड
*
भिलवडी प्रतिनिधी फिरोज मुल्ला
*भिलवडी :* येथील अरमान कय्युम पठाण यांची सांगली जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे.
महा-टीईटी २०२५ व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी हे यश मिळविले. त्यांचे शिक्षण बी.ए., डी.एड. असून त्या मुस्लिम जमातभिलवडीचे माजी सदस्य इकबाल गुलाब पठाण यांच्या सून आहेत.
*शिक्षणातील जिद्द व मेहनतीमुळे यश*
अरमान पठाण यांनी शिक्षणात सातत्य ठेवत जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन केले. त्यांच्या यशामुळे भिलवडी पंचक्रोशीत कौतुक होत असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




إرسال تعليق