* *सांगोला*सांगोला शहरातील मध्यवर्ती असलेल्या एस.टी. स्टँड परिसरात टवाळखोर व रोडरोमिओंचा वावर वाढल्याच्या तक्रारीवरून निर्भया पथकाने आज धडक कारवाई केली आहे* .

* 

 *सांगोला प्रतिनिधी* 


          निर्भया पथक, मंगळवेढा उपविभाग, मंगळवेढा यांनी आज रोजी सांगोला शहरातील एस.टी. स्टँड परिसरात पेट्रोलिंग केले. यावेळी विनाकारण फिरणाऱ्या तरुणांवर *मुंबई पोलीस कायदा कलम ११०/११७* अन्वये कारवाई करण्यात आली.



तसेच वाहतूक (ट्राफिक) अंमलदार यांच्या मदतीने *मोटार वाहन कायद्यान्वये (MV Act) एकूण १३ जणांवर कारवाई करून ११,०००/- रुपये दंड* आकारण्यात आला.




*मार्गदर्शन व पथक -*


ही कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी * शिवपुजे सो.* (उपविभाग मंगळवेढा) आणि मा. पोलीस निरीक्षक * देशपांडे सो.* (सांगोला पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.




या कारवाईत *PSI चव्हाण, HC राजगे, PC कुंभार, PC पांढरे, PC मंडले, PC आवटे* यांनी सहभाग घेतला.


पुढील काळातही महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم