मंगळवेढ्यात शिवसेना-युवासेनेच्या उपोषणाचा दुसरा दिवस; भ्रष्टाचाराविरोधात आंदोलक अर्धनग्न अवस्थेत प्रांत कार्यालय बाहेर आंदोलन




 मंगळवेढा प्रतिनिधी


मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील वाढता भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी आणि सर्वसामान्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 

पहिल्या दिवशी प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आज आंदोलकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उग्र अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.युवासेना शहर प्रमुख अरविंद ज्ञानेश्वर नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने पदाधिकारी आणि शिवसैनिक अंगावरील वरचे कपडे काढून, केवळ भगवे उपरणे परिधान करून अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसले आहेत. आंदोलकांच्या या उग्र स्वरूपामुळे प्रांत कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांचेही लक्ष वेधले जात आहे.या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे:१. मौजे मंगळवेढा येथील गट नंबर ४३४७/३/अ मधील नगर रचना विभागाच्या संशयास्पद झोन दाखल्याची चौकशी करून फेरफार नंबर ४५३३६ ला तातडीने स्थगिती द्यावी.२. जन्म-मृत्यू दप्तरामध्ये बेकायदेशीर फेरफार व कागदपत्रांची छेडछाड केल्याप्रकरणी महसूल सहाय्यक श्री. शिवाजी भोसले यांना तातडीने निलंबित करावे.३. कार्यालयातील गोपनीय अर्ज व संवेदनशील माहिती बाहेर लीक केल्याच्या संशयावरून शिपाई श्री. नागेश महामुनी यांची तातडीने इतर तालुक्यात बदली व्हावी.४. जमीन प्रकरणात एकाच विषयात दोन परस्परविरोधी निकाल देऊन लोकांची फसवणूक केल्याबद्दल मंडळ अधिकारी श्री. धनंजय इंगोले यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी.५. न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारात 'महादेव कोळी' जात प्रमाणपत्र तात्काळ मंजूर करावे.उद्या थाळीनाद आंदोलन होणार:आजच्या अर्धनग्न आंदोलनानंतरही जर प्रांत कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही, तर उद्या ३ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी थाळीनाद आंदोलन केले जाईल, असा इशारा अरविंद नाईकवाडी व समस्त शिवसैनिकांनी दिला आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश माने पंढरपूर युवा सेनेचे शहर प्रमुख घोडके तालुकाप्रमुख गणेश कुराडे शहर प्रमुख प्रतीक होडगे देवदत्त पवार उपस्थित होते आंदोलन काळात उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم