गौरीसमोर साकारला ‘नारीशक्ती’चा देखावा; अजनाळेच्या आरती कोळवले यांचा अनोखा उपक्रम

अजनाळे सचिन धांडोरे :

 गौरी-गणपती उत्सवानिमित्त अजनाळे (ता. सांगोला) येथील आरती चंद्रकांत  कोळवले यांनी गौरीसमोर आकर्षक व संदेशप्रबोधन करणारा देखावा साकारला आहे. या देखाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची झलक दाखविण्यात आली असून, ‘बाईपण आहे भारी...’ या संकल्पनेतून नारीशक्तीचा गौरव करण्यात आला आहे.


देखाव्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला यांसारख्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा संदर्भ देत महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य तसेच विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले आहे.



देखाव्याच्या माध्यमातून “सावित्रीबाईंमुळे शिकते आज प्रत्येक नारी”, “सिंधुताई सपकाळ बनली अनाथांची माऊली”, “कल्पना चावलाने घेतली अवकाशात उत्तुंग भरारी” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. विविध छोट्या प्रतिकृती, फलक, आकर्षक सजावट आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे हा देखावा लक्षवेधी ठरत आहे.




गौरीच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत महिलांचे कर्तृत्व, त्यांचा संघर्ष आणि समाजातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न आरती कोळवले यांनी केला आहे. अजनाळे परिसरातील महिला व भाविकांकडून या देखाव्याचे कौतुक होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم