जवाहर विद्यालय घेरडी येथे गणेश उत्सव निमित्त माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
MPSC, केंद्रप्रमुख, सहाय्यक लेखापद व निवृत्त मुख्याध्यापक आणि पत्रकारांचा सन्मान
सांगोला प्रतिनिधी
प्रास्ताविक: चंदनशिवे सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता गणेश पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. जवाहर विद्यालय घेरडी येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक करताना विजय चंदनशिव यांनी शाळेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, "आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. आज त्यांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे."
मुख्याध्यापक धनंजय डोंगरे यांचे गौरवोद्गार
मुख्याध्यापक धनंजय डोंगरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "शाळा ही केवळ शिक्षणाची संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ आहे. आज सत्कार झालेल्या पाचही विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने व समर्पणाने यश संपादन केले आहे. त्यांच्या मागनि इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घ्यावी."
मार्गदर्शन: आशिष सुतार व शशिकांत कोळी
केंद्रप्रमुख आशिष सुतार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार शशिकांत कोळी यांनी माध्यमांची सामाजिक जबाबदारी व पत्रकारितेत सचोटीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षकांनी मानले.




إرسال تعليق