*पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असलेले नेतृत्व* — *श्री.कौस्तुभ गावडे*
*ज्ञानदानाचा वारसा...., शिक्षकहिताचा ध्यास!...*
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF), भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून श्री कौस्तुभ गावडे निवडणूक लढवत आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील,शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, मामासाहेब जगदाळे, बाबुरावजी घोलप यांच्या पुरोगामी विचारांच्या शिक्षण चळवळीच्या विचारांचा वसा आणि वारसा वारसा, शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अनुभव आणि महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या संघटनात्मक परंपरेची साथ घेऊन श्री. कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. या शिक्षणव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक! विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा, समाजाला दिशा देणारा आणि पुढील पिढीचे भविष्य घडविणारा शिक्षक सक्षम असेल, तरच शिक्षणव्यवस्था अधिक समृद्ध होऊ शकते. म्हणूनच शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे, शिक्षण क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असणारे आणि शिक्षकांच्या हितासाठी शासनदरबारी प्रभावीपणे भूमिका मांडू शकणारे नेतृत्व आज महत्त्वाचे ठरते.
याच पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) पुरस्कृत उमेदवार म्हणून श्री. कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
शिक्षणमहर्षींच्या विचारांचा समृद्ध वारसाश्री. कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक जडणघडणीमागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची समृद्ध परंपरा आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक विचार यांचा महत्त्वाचा संदर्भ आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान व सुसंस्कारा साठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन समाजातील सर्व घटकांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे कार्य केले. शिक्षण, संस्कार, सामाजिक जाणीव आणि मूल्याधिष्ठित जीवन यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले.
श्री.कौस्तुभ गावडे यांच्या दिवगंत मातोश्री प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांनीही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत या शैक्षणिक परंपरेच्या जतनासाठी योगदान दिले. अशा शैक्षणिक वातावरणात घडलेल्या कौस्तुभ गावडे यांना शिक्षण संस्थांचे कार्य, शैक्षणिक प्रशासन आणि संस्थात्मक जबाबदाऱ्यांचा जवळून परिचय मिळाला आहे.
त्यांनी एम.कॉम. आणि एमबीए या पदव्या प्राप्त केल्या असून, २०१९ ते २०२१ या काळात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. २०२१ पासून ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अध्यापन आणि शैक्षणिक प्रशासन या दोन्ही अंगांचा अनुभव त्यांच्या कार्याशी जोडलेला आहे.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDF ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्य करणारी जुनी संघटना आहे. १९६५ मध्ये स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी या संघटनेची स्थापना केली. शिक्षकांचे हक्क, सेवाविषयक प्रश्न, वेतनविषयक मागण्या, निवृत्तिवेतन आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न यांसाठी संघटनेने विविध काळांत आवाज उठविला आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक एकजूट निर्माण करणे, शासनाशी संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांना वाचा फोडणे, ही TDF च्या कार्यपरंपरेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षक प्रतिनिधींनी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व केले आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातही TDF ची जुनी संघटनात्मक पार्श्वभूमी आहे. या परंपरेच्या पुढील टप्प्यात कौस्तुभ गावडे यांना संघटनेने पुरस्कृत उमेदवारी दिली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, संघटनेशी बांधिलकी आणि शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता या निकषांच्या आधारे त्यांच्या उमेदवारीची निवड करण्यात आली आहे.
आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. जुनी पेन्शन योजना, टीईटीची सक्ती,अशैक्षणिक कामांचा संच मान्यतेच्या जाचका अटी, शिक्षक व शिक्षकेतर भरती प्रक्रियेतील अडचणी, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, सेवाशर्ती, शिक्षक प्रशिक्षण आणि बदलत्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी हे विषय शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
शिक्षकांचा अधिकाधिक वेळ अध्यापनासाठी उपलब्ध झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना आवश्यक सुविधा, प्रशासकीय सहकार्य आणि सन्मानजनक कार्यपरिसर मिळाला पाहिजे. शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांवर केवळ आश्वासने देण्याऐवजी त्यांचा अभ्यास करून कालबद्ध निर्णयांसाठी पाठपुरावा व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात पीडीएफच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे हे प्रयत्न करणार आहेत. आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी या सर्व गोष्टी स्पष्ट करून शिक्षकांना याबाबत आश्वासित केले आहे.
कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे आणि अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे या विषयांवर भूमिका मांडली आहे. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याची त्यांची भूमिका या निवडणुकीच्या महत्त्वाचे आहे.
सर्वसमावेशक शिक्षक नेतृत्वाची गरज
पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांचा समावेश होतो. या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांच्या समस्या, शाळांचे स्वरूप, संस्थात्मक अडचणी आणि सेवाविषयक प्रश्न वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा समतोल विचार करणारे आणि विविध शिक्षक संघटनांमध्ये संवा निर्माण करणारे नेतृत्व म्हणजेच श्री कौस्तुभ गावडे.
शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा आधारस्तंभ आहे. शिक्षकांच्या कार्याला सन्मान, त्यांच्या सेवेला सुरक्षितता आणि त्यांच्या समस्यांना न्याय मिळणे ही केवळ शिक्षक समुदायाची मागणी नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेली बाब आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा, मातोश्री शुभांगी गावडे यांची संस्थात्मक कार्यपरंपरा, स्वतःचा शैक्षणिक प्रशासनातील अनुभव आणि महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची शिक्षकहिताची परंपरा या सर्वांचा संगम कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीत दिसून येतो.
लोकशाही समाजवाद, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रभक्ती, धर्मनिरपेक्षता व नियोजन या पंचसूत्री वर आधारित टीडीएफची बांधणी आहे टीडीएफ केवळ एक शिक्षक संघटना नसून हा एक विचार आहे. टीडीएफच्या राज्यध्यक्ष जी.के.थोरात, 
कार्यवाह के.एस.ढोमसे, कार्याध्यक्ष नरसू पाटील, पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव कामथे, सुरेश खोत सुरेश खोत ,बी.डी खामकर, मुरलीधर मांजरे, सर्व राज्य कार्यकारणी सदस्य, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिव व टीडीएफचे संघटनात्मक सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीएफच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडून शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे. येणाऱ्या काळात टीडीएफ च्या माध्यमातून श्री. कौस्तुभ गावडे विभागातील नव्हे तर राज्यातील सर्व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधिल आहेत.
यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी येत्या निवडणुकीमध्ये श्री कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक एकचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची संधी द्यावी ही विनंती.
डॉ भारत इंगवले सर
कार्याध्यक्ष,
पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघ (टीडीएफ )
९७६४०७७७८५


















إرسال تعليق