*सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर केला आहे तर पंचनामे करण्याचे नाटक कशाला*

  *सामाजिक कार्यकर्ता बाबासाहेब खांडेकर*


  प्रतिनिधी अक्षय महामुनी 

2026


मध्ये उद्भवलेल्या भयान दुष्काळ परस्थिती मुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून येणाऱ्या काळाला तोंड कस द्यायचं अश्या विचारात बळीराजा चिंतेत आहे.


     परस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर शासनाने उशिरा सरसकट दुष्काळ जाहीर केला. परंतु निधी तत्काळ शेतकरी ह्यांच्या खात्यात वर्ग करण्यापेक्षा. सरकारने पंचनामां करणे हे नवीन नाटक चालू केलं आहे. त्यासाठी त्यांनी काही कागद पात्रांची अट ठेवली. जी कागद पत्रे शेतकऱ्यांनी पहिलीच काढली आहेत जस की फार्मर आयडी. सात बारा तर सरकार कडे आधीच उपलब्ध आहेत. मग हा फार्स कशासाठी की. महसूल विभाग बळकट करण्यासाठी. कागद पत्रासाठी शेतकऱ्यांना ससेहेलपाट करून. महसूल विभागा मार्फत लूट करणार आणि मग शेतकरी वर्गाला मदत करणार आहात का?

    असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात उभा राहिला आहे.


     परस्थितीचे गांभीर्य सरकारने ओळखून दुष्काळ निधी सरकारने लवकरात लवकर शेतकरी खात्यावर जमा करावा. अन्यथा शेतकरी वर्गातून उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही.


Post a Comment

Previous Post Next Post