*पंढरपुरातील महाद्वारातील मल्लिकार्जुन शिव मंदीर स्थलांतरित करण्याला राष्ट्रीय भारतीय नरहरी सेनेचा प्रखर विरोध प्रसंगी आत्मदहन ही करू :-काकासाहेब बुराडे*
* प्रतिनिधी अक्षय महामुनी * :-
पंढरपूरात होत आसलेल्या कॉरिडॉर मुळे हाजारो वर्षा पुर्वीचे प्राचीन शिवमंदिर स्थलांतरित करण्यात येणार आसल्याचे वृत्तपत्रातील बातमी वाचून समजले हे शिवमंदिर स्थलांतरित करण्याला राष्ट्रीय भारतीय नरहरी सेनेचा प्रखर विरोध आसून प्रसंगी त्या साठी आपण आत्मदहन ही करू आसा इशारा राष्ट्रीय भारतीय नरहरी सेनेचे सर्वसर्वा धर्मभुषण काकासाहेब बुराडे यांनी प्रसार माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.
ज्या वेळी पंढरी नगरीवर दलमाजी नावाचा दरोडेखोर उतमात करीत होता त्या वेळी शककर्ता राजा शालिवाहन यांचे प्रधान रामचंद्र सदाशिव सोनार यांनी चार कोळी सरदार बरोबर घेऊन दलमाजीचा बंदोबस्त केला त्या चार कोळी सरदारांवर खुष होऊन रामचंद्र सोनाराने आपल्या ताब्यातील चार शिवमंदिरे त्या कोळी सरदारांना दिली त्यातील एक हे मल्लिकार्जुन शिव मंदीर आहे या शिवमंदिराचा इतिहास प्राचीन आहे
याच मल्लिकार्जुन मंदीरात संत श्रेष्ठ थोर शिवोपासक सोनार समाज दैवत संत नरहरीमहाराज सोनार यांनी शिवोपासना केली याच शिवमंदिरात बसून त्यांनी आपला व्यवसाय केला ते इतिहास कालीन शिवमंदीर स्थलांतरित करून प्रशासन इतिहासाच्या पाऊल खुणाच नष्ट करण्याच पाप करीत आसेल तर त्याला आमचा प्रखर विरोधच राहील आसे सांगून बुराडे म्हणाले.
अनादी काला पासून अस्तित्वात आसलेले पुरातन मल्लिकार्जुन शिव मंदिर हे पंढरपूर च वैभव व ग्रामदैवत आहे हे ठीकाण म्हणजे सर्व शाखीय सोनार समाजाची अस्मिता आसल्याच बुराडे यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत हे शिवमंदिर स्थलांतरित करू नये प्रशासनाने हे शिवमंदिर स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र भर सर्व शाखीय सोनार समाज अंदोलने निदर्शने करतीलच प्रसंगी आत्मदहनाचा मार्ग ही स्वीकारतील व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.






إرسال تعليق