श्रीविठ्ठल मंदिर जतन संवर्धनासाठी कोट्यावधींचा खर्च! पण मंदिराच्या दोन्ही शिखरांवर वाढलेल्या पिंपळाच्या झाडांकडं दुर्लक्ष - समाजसेवक गणेश अंकुशराव
पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर उगवली पिंपळाची झाडं, श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या शिखराला धोका, पण मंदिर समितीचं दुर्लक्ष; समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी समोर आणलं धक्कादायक वास्तव
पंंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर पिंपळाची झाडं उगवली असुन ही झाडं जमिनीवरूनही नजरेला पडतील एवढी मोठी वाढलेली आहेत. श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या शिखरावर वाढत असलेली ही पिंपळाची झाडं अजुन वाढली तर निश्चितच या दोन्ही शिखरांना तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया पंढरपुरातील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे.
गणेश अंकुशराव यांनी शिखरांवर वाढलेली मोठमोठी पिंपळाची झाडं असलेला फोटो शेअर करत धक्कादायक वास्तव समोर आणलंय.
श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीनं शिखरांवर एवढी मोठी झाडं वाढली तरी याकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल उपस्थित करत अंकुशराव यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनासाठी खर्च केलेले कोट्यावधी रूपये पाण्यात गेल्याचा आरोप करत मंदिर समिती चे अधिकारी व सदस्य यांच्या अशा भोंगळ कारभारामुळेच करोडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरातील सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचं म्हटलंय.
मागील काळात मंदिराचं जतन संवर्धनाचं काम बोगस झाल्यामुळे मंदिराच्या छताला गळती लागल्याची बाबही गणेश अंकुशराव यांनी निदर्शनास आणून दिली होती. आत्ता शिखरांवर उगवलेली पिंपळाची झाडं मंदिर समितीनं वेळीच काढून टाकली नसल्याचं दाखवून पुन्हा एकदा मंदिर समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
गणेश अंकुशराव यांनी समोर आणलेली शिखरावरील वाढलेल्या झाडांची दृश्य पाहता निश्चितच आता तरी ही झाडं तातडीनं काढून टाकणं आवश्यक आहे अन्यथा ही झाडं आणखी वाढली तर दोन्ही शिखरांना यापासून धोका होऊ शकतो. जर मंदिर समितीकडं यासाठी आवश्यक तो निधी अथवा कर्मचारी नसतील तर आम्ही व आमचे कार्यकर्ते स्वखर्चाने ही झाडं काढून टाकतो असं सांगत तातडीने ही झाडं जर काढली नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला






إرسال تعليق