*सांगोल्यातील सराफ व्यावसायिक अक्षयभैय्या महामुनी यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी नियुक्ती* 

*सांगोला (प्रतिनिधी) -* 

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगोला येथील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक व समाजसेवक मा. श्री. अक्षयभैय्या महामुनी यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे.


ही नियुक्ती समितीचे मार्गदर्शक प्रसिद्ध सराफ मा. एस. जे. कायगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.



राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुजीतशेठ जगताप, राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. शशिकांतजी दीक्षित, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. जगदीशशेठ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. गोकुळ जी लोळगे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीनिवासजी बाणकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. गणेशशेठ मैड यांच्या विनंतीवरून सदर नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم