*सांगोल्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गावर पथचलन, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान* 


*सांगोला प्रतिनिधी* .

 *सांगोला, ता. 13 :* श्री गणेश उत्सव व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सांगोला शहरात आज दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च (पथसंचलन) काढला.



सांगोला पोलीस ठाणे येथून या रूट मार्चला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, भीम नगर, वाडेगाव नाका, महादेव गल्ली, गोष्ट गल्ली, मेन रोड हनुमान मंदिर, जय भवानी चौक, नेहरू चौक, महात्मा फुले चौक ते वासूद चौक पर्यंत प्रमुख मार्गाने हे पथसंचलन करण्यात आले.



यावेळी गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.



सदर रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, दंगा काबू पथक तसेच होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




Post a Comment

أحدث أقدم