*सांगोला येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई - ३७ हजारांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
*सांगोला प्रतिनिधी
*सांगोला (दि. २४ सप्टेंबर २०२६) -* अन्न व औषध प्रशासन, सोलापूर झोन-२ च्या भरारी पथकाने आज दि. २४/०९/२०२६ रोजी सांगोला शहरात मोठी कारवाई केली आहे.
*कारवाईचा तपशील :*
वज्राबाद पेठ, सांगोला येथील *मे. अक्षय ट्रेडिंग कंपनी* या वाहन/दुकानावर FDA ने छापा टाकला. या छाप्यात प्रतिबंधित असलेला *सुगंधित तंबाखूचा साठा* आढळून आला.
जप्त केलेल्या मालाची किंमत *रु. ३७,०८०/-* इतकी आहे.
*कारवाईचे कारण :* प्रतिबंधित अन्न पदार्थाची साठवणूक व विक्री करणे.
प्रशासनाने सदरचे *प्रेमायसेस (जागा) सील* केले आहे.
या प्रकरणी *सांगोला पोलीस ठाण्यात FIR No. ०९०३/२०२६* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आरोपींची नावे :*
१) अक्षय अनिल मस्के, मस्के कॉलनी, सांगोला, जि. सोलापूर (विक्रेता)
२) पोपट मेहबूब खातिक, मस्के कॉलनी, सांगोला
*लावलेली कलमे :* BNS कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) आणि ५९.
*तपास अधिकारी :* अन्न सुरक्षा अधिकारी श्री. जी.एम. कदम यांनी तपास केला असून क्षेत्र सहायक आयुक्त (अन्न) श्री. एस.ई. देसाई आणि सह आयुक्त (अन्न) श्री. डी.डब्ल्यू. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे सांगोला शहरातील प्रतिबंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.








إرسال تعليق