*अखेर राज्यात दुष्काळ जाहीर. देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा* 



 *सांगोला प्रतिनिधी* 

राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच सुमारे ७५ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आला आहे.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आज शासन निर्णय क्रमांक समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२ नुसार परिशिष्ट-१ जाहीर करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.



येत्या ५ ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ही कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र आणि जीपीएस संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.




दुष्काळामुळे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजना: • जमीन महसुलात सूट • पीक कर्जाचे पुनर्गठन • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती • कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (७.५ हॉर्सपॉवर क्षमतेच्या पंपांचे बिल आधीच माफ, आता त्यावरील क्षमतेच्या पंपांनाही सूट) • शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी • रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करणे • आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स पुरवणे • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे • शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी / शेतमजुरांना अन्नधान्य पुरवठा • जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था • जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणे  २६५ तालुक्यांची महसूल विभाग निहाय संपूर्ण यादी:



१. ठाणे महसूल विभाग - एकूण १२ तालुके

• ठाणे (०): निरंक • पालघर (०): निरंक • रायगड (१): श्रीवर्धन • रत्नागिरी (३): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर • सिंधुदुर्ग (८): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला 



२. नाशिक महसूल विभाग - एकूण ४९ तालुके

• नाशिक (१०): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा • धुळे (४): धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर • जळगाव (१५): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल • नंदुरबार (६): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी • अहिल्यानगर (१४): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता 



३. पुणे महसूल विभाग - एकूण ३५ तालुके

• पुणे (८): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर • सोलापूर (११): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा • सांगली (४): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ • सातारा (६): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर • कोल्हापूर (६): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड 


४. छ. संभाजीनगर महसूल विभाग - एकूण ७९ तालुके

• छ. संभाजीनगर (९): छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री • जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद • बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी • लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट • धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा • नांदेड (१४): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव • परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी • हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत 


५. अमरावती महसूल विभाग - एकूण ५६ तालुके

• बुलढाणा (१३): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलढाणा, शिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा • अमरावती (१४): अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापूर • अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी • वाशिम (६): वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा • यवतमाळ (१६): यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव 



६. नागपूर महसूल विभाग - एकूण ३४ तालुके

• वर्धा (७): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी • नागपूर (१४): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर • भंडारा (३): भंडारा, पवनी, लाखांदूर • गोंदिया (१): तिरोडा • चंद्रपूर (१२): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभूर्णा • गडचिरोली (२): गडचिरोली, चामोर्शी 


अशा प्रकारे एकूण २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार आहे.



Post a Comment

أحدث أقدم