*सांगोल्यातून 12 टन डाळिंब घेऊन जाणारा ट्रक गायब! 16 लाखांचा माल लांबवल्याचा आरोप*


 *सांगोला/सांगोला (प्रतिनिधी* 

 सांगोला येथील ए.व्हि. ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक अनिल मधुकर विभुते (वय 39, रा. ब्रम्हचैतन्य नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दि. 20/09/2026 रोजी रात्री 21:00 वा. आदर्श ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टिक मार्फत आयशर कंपनीचा ट्रक *क्रमांक UP 58 AT 3782* भाडेतत्वावर घेण्यात आला होता. या ट्रकमध्ये सिलीगुडी (प. बंगाल) येथील व्यापारी लालूभाई यांच्याकडे पाठवण्यासाठी *12 टन म्हणजे 1182 बॉक्स डाळिंब (किंमत 16,00,000/- रुपये)* भरले होते. सांगोला ते सिलीगुडी असे 1,15,000/- रुपये भाडे ठरले होते. चालकाला 30,800/- अॅडव्हान्स आणि 19,200/- चे डिझेल देण्यात आले होते.


*दि. 21/09/2026 सकाळी 11:00 वा.* बिल्टी क्र. 1295 बनवून ट्रक सिलीगुडीसाठी रवाना झाला. नियमानुसार 52 तासात पोहोचणे आवश्यक असताना ट्रक पोहोचलाच नाही.


फिर्यादीने ब्लॅक बग अॅपवर लोकेशन चेक केले असता -

- पहिला टोल - दि. 21/09/2026 रोजी 20:04 मि. पारगाव श्रीगोंदा- शेवटचा टोल - दि. 22/09/2026 रोजी 17:51 वा. भोपाल-विदिशा (म.प्र.) नंतर दि. 25/09/2026 रोजी 07:00 वा. भिताहा टोल प्लाझा, गोरखपूर येथे लोकेशन दिसले.


त्यानंतर दोन्ही चालकांचे मोबाईल स्विच ऑफ आले. ट्रक मालक गोविंद राधेश्याम जायसवाल (UP) याने गाडी बनारस येथे फायनान्स कंपनीच्या यार्डात जमा असल्याचे सांगितले.


यावरून ट्रक चालक *कमलेश सुरेंद्र राजभर (मो. 7300956239) व पंचांग दास (मो. 8853967622) रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश* यांनी संगनमताने 12 टन डाळिंबाची परस्पर विल्हेवाट लावून अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post